होमपेज › Belgaon › रायबागमध्ये वैद्यकीय कचरा रस्त्यावर

रायबागमध्ये वैद्यकीय कचरा रस्त्यावर

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 8:45PMरायबाग : प्रतिनिधी 

रायबाग येथील खासगी दवाखान्यातील डॉक्टर दवाखान्यातील टाकावू इंजेक्शन, औषधे आदी टाकावू वस्तू सार्वजनिक स्थळी टाकत आहेत. रायबाग शहराच्या रस्त्याच्या बाजूस या वस्तू दिसून येत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. 

येथील नंदीकुर्ली रस्त्यावर दवाखान्यातील टाकाऊ वस्तू प्लास्टिक पिशवीत घालून टाकण्यात आल्या आहेत.  दवाखान्यातील या वस्तूंची योग्य जागी विल्हेवाट लावावी किंवा जाळून टाकाव्यात, अशी मागणी होत आहे. नंदीकुर्ली रस्त्यावर भरपूर रहदारी असते. या रस्त्यावरून नागरिक वाहनचालक, विद्यार्थी, येथील नागरिकांची ये-जा असते. तसेच येथील शेतकरी वर्ग जनावरे चारण्यास सोडत असतात. त्यामुळे जनावरांनाही या कचर्‍यापासून धोका निर्माण झाला आहे.  

तालुका वरिष्ठ वैद्याधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन संबंधितांवर योग्य कारवाई करावी. यासाठी सर्व वैद्याधिकार्‍यांना बोलावून दवाखान्यातील टाकावू वस्तूंची कोठे व कशी विल्हेवाट लावावी, याबाबत सूचना करावी. त्यानंतरही असे प्रकार पुन्हा आढळून आल्यास त्या दवाखान्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.