Wed, Mar 27, 2019 02:31होमपेज › Belgaon › जंगली प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाय

जंगली प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाय

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 11:15PMबेळगाव : प्रतिनिधी

खानापुरातील त्रस्त शेतकर्‍यांनी जिल्हा वनधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दिवसभर ठिय्या आंदोलन छेडल्यामुळे जागे झालेल्या वनाधिकार्‍यांनी जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांवर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली आहे.

जिल्हा उपवनधिकारी बसवराज पाटील यांनी संध्याकाळी 5.30 वाजता  शेतकर्‍यांच्या समस्या ऐकून घेऊन त्यांच्या निवेदनाचा स्वीकार करुन लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले. गेल्या काही दिवसांपासून खानापूर तालुक्यातील विविध ठिकाणी हिंस्र प्राण्यांचा वाढलेला वावर नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.