Mon, Feb 18, 2019 07:31होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी पक्षभेद बाजूला ठेवा

सीमाप्रश्‍नी पक्षभेद बाजूला ठेवा

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:44PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

सीमा प्रश्‍न सोडवण्यासाठी जात, धर्म, पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. हा प्रश्‍न सुटला, तर सीमाभागातील लाखो मराठी भाषिक मुलांचे भवितव्य घडणार आहे. यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरच्या  महापौर स्वाती यवलुजे यांनी केले.

निपाणी येथे हुतात्मा कमळाबाई मोहिते यांना अभिवादन करताना त्या बोलत होत्या. यावेळी शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, शिवसेना सीमाबांधवाच्या पाठीशी कायम आहे.कर्नाटक शासन कन्नड भाषिकांची संख्या जाणीवपूर्वक सीमाभागात वाढवत आहे. मराठी भाषिकांना न्याय मिळाला पाहिजे.

यावेळी मोहन बुडके, प्रा. भारत पाटील, गणी पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. जयराम मिरजकर यांनी प्रास्ताविकात सीमा प्रश्‍नाची सद्यस्थिती यावर विवेचन केले. नगरसेवक संजय सांगावकर यांनी येथे पालिकेमार्फत कमळाबाई मोहितेंचे स्मारक उभारणार असल्याची ग्वाही दिली. हुतात्मा दिनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.