Wed, Feb 20, 2019 21:42होमपेज › Belgaon › हुतात्मा मंजुनाथ अमर रहे...

हुतात्मा मंजुनाथ अमर रहे...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

धारवाड :

‘अमर रहे...अमर रहे, मंजुनाथ अमर रहे’ अशा घोषणांनी गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेले ‘सीआरपीएफ’चे जवान मंजुनाथ शि. जक्‍कण्णनवर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी मनगुंडी (जि. धारवाड) येथे मंगळवारी शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात आले.

रविवारी नक्षवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान मंजुनाथ गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर  इस्पितळात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. मंजुनाथ यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी धारवाड येथे आणण्यात आले. आर. एन. शेट्टी क्रीडांगणावर  काही काळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांसह अन्य वरिष्ठ अधिकारी, माजी आ. सीमा मसूती आदींनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

त्यानंतर उघड्या जीपमधून अंत्ययात्रेने पार्थिव मनगुंडी येथील मंजुनाथ यांच्या निवासस्थानासमोर आणण्यात आले.