Tue, Oct 22, 2019 01:32होमपेज › Belgaon › विवाहितेला जाळले

विवाहितेला जाळले

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 15 2017 11:15PM

बुकमार्क करा

खानापूर : वार्ताहर

हुंड्यासाठी विवाहितेला जाळून मारल्याची घटना गुरुवारी सयंकाळी हिरेमुन्नोळी (ता. खानापूर) येथे घडली. श्‍वेता नागय्या वस्त्रद (वय 35)असे तिचे नाव आहे. पती नागय्या वस्त्रद व तिच्या सासूला नंदगड पोलिसांनी ताब्यात घेतले.

लग्नात हुंडा आणला नाही यावरून  मुलीला नेहमी पती आणि सासूकडून जाच व्हायचा. ते मारबडव करून हाकलून लावायचे. यांनीच मुलीवर रॉकेल ओतून जाळले, अशी तक्रार विवाहितेची आई सुनंदम्मा केंचय्या हिने नंदगड पोलिसांत केली.

अर्धवट जळालेल्या अवस्थेत श्‍वेताला बेळगावातील सरकारी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र,  तासाभरातच तिचा मृत्यू झाला. पती नागय्या आणि त्याच्या आईला हुंडाबळी कायद्याखाली अटक केली. उपनिरीक्षक यू. एस. अवटी तपास करीत आहेत.