Sat, Jul 20, 2019 12:56होमपेज › Belgaon › मराठी युवकांना मारहाण, पोलिसांना नोटीस

मराठी युवकांना मारहाण, पोलिसांना नोटीस

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 10:26PMबेळगाव : प्रतिनिधी

काळादिन फेरीत सहभागी झालेल्या मराठी युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन शहापूर पोलिस स्थानकात बेदम मारहाण केली होती. याबाबत पोलिसांना कारणे दाखवा नोटीस न्यायालयाने बजावली आहे. परंतु, पोलिसांनी त्याकडे डोळेझाक चालविली आहे. न्यायालयात  उत्तर देण्यास टाळाटाळ चालविली आहे. याबाबतची सुनावणी 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. 

1 नोव्हेंबर 2016 रोजी काळादिन फेरी निघाली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या 43 मराठी युवकांना ताब्यात घेऊन विविध गुन्हे दाखल केले. याचबरोबर ताब्यात घेतलेल्या दिवशी युवकांना मारहाण केली होती. याबाबत मराठी युवकांच्यावीने अ‍ॅड. महेश बिर्जे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परंतु, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

पोलिसांनी 3 व 4 नोव्हेंबर 2016 रोजी एकूण 43 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर शहापूर पोलिस स्थानकात कलम 143, 147, 11111153 (अ), 427 सहकलम 149 न्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर सायंकाळी पोलिस स्थानकात सदर युवकांना बेदम मारहाण केली. दरम्यान, याबाबतची सुनावणी तिसर्‍या जेएमएफसी न्यायालयात मंगळवार 14 रोजी होणार असल्याची माहिती अ‍ॅड. महेश बिर्जे यांनी दिली.