Wed, Apr 24, 2019 12:07होमपेज › Belgaon › मंगळवारी मिळणार मराठी पाठ्यपुस्तके?

मंगळवारी मिळणार मराठी पाठ्यपुस्तके?

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:16PMबेळगाव : प्रतिनिधी

पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण करण्याचा संकल्प केलेल्या शासनाला सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तके पुरविता आलेली नाहीत. केवळ कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना 16 मेपासून पाठ्यपुस्तके वितरण सुरू झाले. मात्र 15 जूनपर्यंत मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांना पाठ्यपुस्तके मिळणार होती. मंगळवारी 18 जूनपर्यंत पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती सरदार्स हायस्कूलमधून देण्यात आली. 

यंदा राज्यात केवळ कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना वेळेत पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. सीमाभागात नेहमी मराठीचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कर्नाटक शासनाने चालविला आहे. यंदा देखील शैक्षणिक वर्षारंभाला केवळ मराठी व उर्दू शाळांना नवीन पाठ्यपुस्तके मिळालीच नाहीत. 

9 लाख पुस्तकांची कमतरता

जिल्ह्यात 24 लाख 94 हजार 598 पुस्तकांची मागणी आहे. त्यापैकी 15 लाख 77 हजार 910 पुस्तके उपलब्ध झाली आहेत. उर्वरित 9 लाख 16 हजार 688 पुस्तकांचा पुरवठा होणे बाकी आहे. त्यामध्ये मराठी व उर्दू शाळांचा सामावेश आहे. या माध्यमाच्या  विद्यार्थ्याना पुस्तके उपलब्ध होण्यासाठी 15 जुनपर्यंत पाठ्यपुस्तके मिळणार होती.  आता  मंगळवार दि.19 जूनची मुदत देण्यात आली आहे.

आचारसंहितेचे कारण 

मराठी व उर्दू माध्यमातील शाळांची पाठ्यपुस्तके वेळेत का मिळाली नाहीत अशी चौकशी करता आचारसंहितेचे कारण पुढे करण्यात आले आहे. शिक्षकवर्ग निवडणुकीच्या कामात गुंतला असल्याने वेळेत मुद्रण करण्यासाठी वेळ मिळाला नाही. बंगळूर येथील कर्नाटक प्रिंटीं प्रेसमध्ये पाठ्यपुस्तकाची छपाई होत असल्याने पहिल्यांदा 
कन्नड माध्यमाची पुस्तके छपाईसाठी घेण्यात आली. त्यानंतर इंग्रजी माध्यमाला प्राधान्य  दिले आहे. अनुक्रमे मराठी व उर्दू माध्यमाच्या  पाठ्यपुस्तकांची छपाई करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तके मिळण्यास विलंब झाला आहे, असे सांगण्यात आले.