Thu, Jun 20, 2019 00:33



होमपेज › Belgaon › सीमाभागावर मराठी लोकांचेच वर्चस्व

सीमाभागावर मराठी लोकांचेच वर्चस्व

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:23PM



बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरासह सीमाभागावर मराठी लोकांचेच वर्चस्व आहे. त्यांनी कधीही जिल्ह्यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला नाही. मराठी लोक फक्त महाराष्ट्रात जाण्यासाठी लढत असताना, कन्नड संघटनांना मराठी लोकांची भीती का, असा प्रश्न मराठी भाषिकांकडून करण्यात येत आहे.

चिक्कोडीला वाढीव सुविधा द्या

चिकोडीला आणखी अधिक सुविधा देऊन समस्या निवारणाकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणीही कन्नड नेत्यांनी केली. सत्तेसाठीच जिल्ह्याचे विभाजन करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात आला. राज्य सरकारने अनेक भाग्ययोजना राबविल्या आहेत. यामुळे आता विभाजनाचीही भाग्ययोजना राबविण्यात यावी, अशी उपरोधक टीका यावेळी करण्यात आली. 

बेळगाव जिल्ह्याचे विभाजन झाल्यास उर्वरित बेळगाव जिल्ह्यात मराठी लोकांचे प्राबल्य वाढेल, असे बैलहोंगलचे आमदार डॉ. विश्‍वनाथ पाटील यांनीही म्हटले आहे.  पाटील हे बेळगाव जिल्हा विभाजन विरोधी आंदोलन समितीचे मानद अध्यक्ष आहेत. या समितीचे अध्यक्ष शिवरंजन बोळण्णवर यांच्यासेाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे वक्तव्य केले.

बेळगाव जिल्ह्याचे कोणत्याही परिस्थितीत विभाजन करू नये. प्रशासकीयद‍ृष्ट्या तशी वेळ उद्भवलीच तर उपविभागीय केंद्र असलेल्या बैलहोंगलला जिल्हा केंद्रस्थान देण्यात यावे, अशी मागणीही डॉ. पाटील यांनी यावेळी केली.जिल्हा विभाजनाचा गेल्यावेळी प्रयत्न झाला. त्यावेळी बैलहोंगलच्या जनतेने प्रखर विरोध केला होता. सध्या सुरू असलेल्या घडामोडींवरून बेळगाव जिल्ह्याचे विभाजन निश्‍चित होईल, असे वाटत आहे, असेही ते म्हणाले. 

URL :