Tue, Apr 23, 2019 07:36होमपेज › Belgaon › एकाच नावाचे अनेक उमेदवार एकमेकांसमोर

एकाच नावाचे अनेक उमेदवार एकमेकांसमोर

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 8:40PMबेळगाव : प्रतिनिधी

एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीत एकमेकांसमोर ठाकले आहेत. हासन जिल्ह्याच्या  होळेनरसिपूर  मतदारसंघात एच. डी. रेवण्णा हे विशेष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. रेवण्णा हे निधर्मी जनता दलाचे सर्वेसर्वा देवेगौडा यांचे पुत्र, निधर्मी जनता दलाचे नेते नव्हेत  तर  चिक्कमंगळूर जिल्ह्याच्या  केंपनहळ्ळी येथील दोड्डेगौडर यांचे पुत्र एच. डी. रेवण्णा. चिक्कमंगळूर येथे तहसील कार्यालयासमोल स्टँप विक्रीचा व्यवसाय तसेच विमा एजंट म्हणून काम करीत आहेत. 

राज्यातील 30 हून अधिक  मतदारसंघात दहाहून अधिक प्रबळ उमेदवाराना डमी उमेदवारांशी सामना करावा लागत आहे. समाजकल्याण अधिकारी  एच. अंजनेय  हे होळलकेरेमधून स्पर्धा करीत असून त्याना त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवाराशी लढत द्यावी लागणार आहे.मंड्या जिल्यातील मेलुकोटे मतदारसंघात निजद उमेदवार खा. सी. एस. पुट्टराजू आणखी एक उमेदवार रिंगणात आहे. एका उमेदवाराचे नाव सी. एस. पुट्टराजू तर यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचे नाव बी. के. पुट्टराजू. 

असे मतदारसंघ, असे उमेदवार

यलेहंका ः 
एम.एन.गोपालकृष्ण ( काँग्रेस)
एच.के.गोपालकृष्ण (अपक्ष)
ए.एम.हनुमंतेगौडा (निजद)
एच.एन.हनुमंतेगौडा (अपक्ष).

हेब्बाळ : 
बी.एस.सुरेश(काँग्रेस)
बी.एस.सुरेश (अपक्ष)
बी.एस.सुरेश(अपक्ष)
वाय.ए.नारायणस्वामी (भाजप)
एम.नारायणस्वामी(अपक्ष)
डी.नारायणस्वामी (अपक्ष).

चिंतामणी 
डॉ.एम.सी.सुधाकर (भाप्रपक्ष)
एन.आर.सुधाकर
एम.सुधाकर
के.सुधाकर रेड्डी
टी.ए. सुधारकररेड्डी
आर.सुधाकर (सर्वजण अपक्ष).
सी.व्ही.रामननगर 
एस.रघु (भाजप)
एस. रघु (अपक्ष)

बंगळूर दक्षिण
ए.सी. श्रीनिवास (काँग्रेस)
श्रीनिवास (अपक्ष)
व्ही. श्रीनिवास (अपक्ष)
एम. कृष्णप्पा (भाजप)
एम.कृष्णप्पा  (अपक्ष). 

आनेकल
ए.नारायणस्वामी (भाजप)
ए.नारायणस्वामी (अपक्ष)
सी.नारायणस्वामी (अपक्ष)

शिडलघट्ट
जे.के.कृष्णारेड्डी (निजद)
कृष्णारेड्डी (अपक्ष)
एम.कृष्णरेड्डी (अपक्ष)
एम.कृष्णरेड्डी (अपक्ष).

मेलुकोटे
 सी.एस.पुट्टराजु (निजद)
बी.के.पुट्टराजु (अपक्ष).

मस्की
बसनगौडा (भाजप)
बसवनगौडा (अपक्ष).

होळेनरसिपूर 
एच.डी. रेवण्णा (निजद)
एच.डी. रेवण्णा (अपक्ष).

जयनगर
बी.एस.विजयकुमार (भाजप)
विजयकुमार (अपक्ष).

अरकलगूडु 
ए.मंजुकाँग्रेस)
एच.मंजु (पीपल्स पार्टी).