होमपेज › Belgaon › सीरियल किलर सायनाईड मोहनला जन्मठेप

सीरियल किलर सायनाईड मोहनला जन्मठेप

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 12:11AMमंगळूर : प्रतिनिधी 

तब्बल 20 जणांच्या खुनाचा संशय असलेल्या सायनाईड मोहनला आज जन्मठेपेची शिक्षा झाली. 25 सप्टेंबर 2009 रोजी बंटवाल तालुक्यात एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी येथील सहाव्या अतिरिक्‍त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मोहनला शनिवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आपल्या आदेशात न्या.डी.टी.पुट्टरंगस्वामी यांनी आरोपी सायनाईड मोहनला खुनासाठी जन्मठेप देण्याबरोबरच दरोड्यासाठी 6 वर्षे, अपहरणासाठी 6 वष, बलात्कारासाठी 7 वर्षे कारावास अशी स्वतंत्र शिक्षाही ठोठावली. मोहन हा 20 खूनप्रकरणी आरोपी असून यापैकी 5 प्रकरणी तो दोषी ठरला आहे. मोहन कुमार ऊर्फ सायनाईड मोहन हा पेशाने शिक्षक असून त्याच्यावर दक्षिण कन्‍नड आणि कासरगोड जिल्ह्यातील 20 हून अधिक भोळ्या-भाबड्या महिलांवर बलात्कार करून त्यांचे खून केल्याचे आरोप आहेत.