होमपेज › Belgaon › दरोडेखोरांच्या टोळीत व्याख्याता 

दरोडेखोरांच्या टोळीत व्याख्याता 

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 11:57PM

बुकमार्क करा

मंड्या : प्रतिनिधी  

 पोलिसांनी दरोडे घालणार्‍या एका 13 जणांच्या टोळीला अटक केली असून त्यामध्ये एका अतिथी व्याख्यात्याचा व एका सरकारी कर्मचार्‍याचा समावेश आहे. मंड्या शहराबाहेर एका ठिकाणी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी शिताफिने अटक केली. या टोळीने  जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी दरोडे घातले असून त्या घटनांमध्ये खूनही केले आहेत. अटक केलेल्यांमध्ये मोरारजी देसाई महाविद्यालयातील एका अतिथी व्याख्यात्याचा समावेेेश आहे.

तर मंड्या पशुवैद्यकीय इस्पितळातील   कर्मचारी के.आर.कार्तिक, ए.अनिलगौडा, राघवेंद्र, एच.व्ही.राजेश, रिजवान पाशा, एन.मनु, एम.के.शिवराजू, बी.निंगेगौडा, डी.एम.नितीन, एम.श्रेयस, योगेश व बेनेडिक्ट यांचा समावेश आहे. या टोळीचे वैशिष्ठ्य म्हणजे शहराबाहेरील घरामध्ये दरोडे घालून लूट करणे व रात्रीच्यावेळी बंगळूर, म्हैसूर महामार्गावर वाहने अडवून लूट करणे, दरोडा घालताना कोणी विरोध केला तर त्यांचा ते खूनही करीत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 मारूती कार, 1टोयोटा कार, 4 मोटारसायकली व शस्त्रे जप्त केली आहेत.