Thu, Jun 20, 2019 21:20होमपेज › Belgaon › संक्रांतीची चाहूल

संक्रांतीची चाहूल

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 8:16PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

नववर्षातील पहिल्या हिंदू सणाची चाहूल लागली आहे.  बाजारपेठेत रस्त्याशेजारी आणि कोपर्‍या कोपर्‍यावर रंगबेरंगी तिळगुळाचे स्टॉल दिसू लागल्यामुळे सर्वांना स्नेहभावाच्या मकर संक्रांतीची लगबग पाहायला मिळत आहे.

मकर संक्रांत सणाच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगी दिवशी सासरच्या मुली माहेरी येतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालून जावयाला आहेर देण्याची पद्धत आहे. 

या सणात नववधूसह महिलांना नवीन बांगड्या भरण्याची पध्दत आहे. त्यामुळे बांगड्यांच्या दुकानातून विविध बांगड्यांचा स्टॉक  दिसू लागला आहे.हिवाळ्यात साजर्‍या केल्या जाणार्‍या मकर संक्रांतीत शरीराला पौष्टिक ठरणार्‍या पदार्थांची रेलचेल असते. 

शहरात जागोजागी तिळगुळाचे स्टॉल लागलेले दिसत आहेत.  तिळगुळ ठेवण्यासाठी लहान-मोठे प्लास्टिकचे रंगबिरंगी डबे विक्रीस आले आहेत.20 ते 50 रुपयांपर्यंत प्लास्टिक बंद पाकिटातून तिळगुळ उपलब्ध आहेत. साधे तिळगूळ 80 ते 110 रुपये प्रति किलो, काटेरी 120 ते 140 रुपये, हलवा 200 ते 270 रुपये, रेवडी 30ते 40 ़रुपये, चिक्‍की 20 ते 50 रुपये पाकीट असे दर आहेत.