Mon, Jun 24, 2019 21:03होमपेज › Belgaon › ‘पंतप्रधान कौशल्य विकास’मुळे गरीब, बेरोजगार युवकांना लाभ

‘पंतप्रधान कौशल्य विकास’मुळे गरीब, बेरोजगार युवकांना लाभ

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 09 2017 10:38PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

देशातील प्रत्येक  नागरिकाला एखादा उद्योग निर्माण करून देण्यासाठी तसेच स्वावलंबी बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या महत्वाकांक्षी पंतप्रधान कौशल्य विकास योजनेमुळे गोरगरीब जनता, बेरोजगार युवकांना लाभ होणार आहे. त्याचा प्रत्येकाने सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन खा. सुरेश अंगडी यांनी केले. 

येथील दरबार गल्लीमधील रोमन टेक्नॉलॉजी संस्थेच्या सहकार्यातून सुरू करण्यात आलेल्या  पंतप्रधान कौशल्य प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी या उपक्रमाची सुरूवात केली आहे. युवकांना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वंयउद्योग करण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. 

देशात 65 टक्के युवकांची संख्या आहे. या सर्वांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा देण्यात येणार आहे. कोणतीही जात, धर्म, भाषा न राखता सर्वांसाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत, असेही खा.सुरेश अंगडी यांनी सांगितले.  या कौशल्य केंद्राचे प्रमुख आशिप सय्यद यांनी उपक्रमाची माहिती दिली. या ठिकाणी 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.   कार्यक्रमाला मुक्‍तार पठाण, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य रिझवान बेपारी, फिरोज जमादार, इम्रान पठाण, अलताफ बंदार आदी उपस्थित होते.