Wed, Sep 26, 2018 08:13होमपेज › Belgaon › कचर्‍यापासून वीज, विटा

कचर्‍यापासून वीज, विटा

Published On: Jun 12 2018 12:51AM | Last Updated: Jun 12 2018 12:19AMबेळगाव : वार्ताहर

शहरातील कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कोरियन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कचर्‍यापासून वीज, विटा तयार करण्यात येतील, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. 

आ.अनिल बेनके  यांच्या कार्यालयात कोरियन कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी व मनपा अधिकारी उपस्थित होते.

तुरमुरी डेपोत टाकण्यात येणार्‍या कचर्‍यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प होणे आवश्यक आहे. याबाबत खोगा एनर्जी अँड पॉश कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करण्यात आली. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाने जागा आणि पाण्याची व्यवस्था करावी. घन आणि ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून ऊर्जा तयार करण्यात येते. यातून वीज आणि विटा तयार होतात, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांमिले.

आ.  बेनके म्हणाले, कंपनीशी चर्चा केली असून पुढील आठवड्यात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा अधिकारी यांच्यापुढे कंपनी माहिती सादर करणार आहे.