Tue, Nov 13, 2018 21:22होमपेज › Belgaon › नव्या निपाणी तालुक्याचे अंतिम गॅझेट प्रसिद्ध

नव्या निपाणी तालुक्याचे अंतिम गॅझेट प्रसिद्ध

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 10:27PMनिपाणी : प्रतिनिधी

राज्य शासनाने नव्या निपाणी तालुक्याचे अंतिम गॅझेट गुरुवारी प्रसिद्ध केले महसूल खात्याचे उपसचिव कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी हे नोटिफिकेशन जाहीर केल्याची माहिती आ. शशिकला जोल्ले यांनी दिली. नव्या निपाणी तालुक्यामध्ये  55 गावांचा समावेश आहे.

यामुळे निपाणीत लवकरच नवे तालुका केंद्र व तहसीलदार कार्यालय सुरू होणार असल्याचे आ. जोल्ले यांनी सांगितले. तहसीलदारांच्या नेमणुकीनंतर लवकरच कार्यालय सुरू होणार आहे. यावेळी पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.