Tue, Mar 26, 2019 02:03होमपेज › Belgaon › काँग्रेस आमदार पाटील भाजपमध्ये

काँग्रेस आमदार पाटील भाजपमध्ये

Published On: Mar 22 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 11:02PMविजापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील देवरहिप्परगीचे आमदार ए.एस. पाटील( नडहळ्ळी) यांनी बुधवारी दुपारी बंगळूर येथील भाजप कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुराप्पा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

2008 व 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार ए.एस.पाटील ( नडहळ्ळी) यांना सहा महिन्यापूवीर्र् काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना निधर्मी जनता दलात प्रवेश केला होता. एवढेच नव्हे तर त्यांना जिल्ह्यातील मुद्देेबिहाळ विधानसभा मतदार संघातून निधर्मी जनता दला कडून उमेदवारीसुध्दा जाहीर करण्यात आली होती, तसेच निधर्मी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या कुमारपर्व यात्रेसह अनेक जाहीर कार्यक्रमांत ते सहभागी झाले होते. मात्र, अचानक त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडली आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठल कटकोंड व मुद्देबिहाळ संघातील भाजपमधील इच्छुकांनीच मंगळवारी  पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्या भाजप प्रवेशास विरोध केला होता. त्यामुळे आजच्या त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपाच्या इच्छुक उमेदवार व कार्यकत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

 

Tags : belgaon, belgaon news, BJP, MLA A.S. Patil,