Mon, Mar 25, 2019 09:09होमपेज › Belgaon › एकीबाबतच्या बैठकीला ‘त्या’ नेत्याने मारली दांडी

एकीबाबतच्या बैठकीला ‘त्या’ नेत्याने मारली दांडी

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 18 2018 11:57PMबेळगाव : प्रतिनिधी

म. ए. समितीच्या एकीबाबत बुधवारी वडगाव परिसरात सुरेश हुंदरे स्मृती मंचतर्फे आयोजित बैठकीला ‘त्या’ नेत्याने अनुपस्थिती दर्शविली. यामुळे उपस्थित असलेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या नेत्यांना केवळ साधकबाधक चर्चा करून माघारी फिरावे लागले. याबाबत हुंदरे स्मृती मंचच्या वतीने नेत्यांना गुरुवारी सकाळी 11 पर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही केले आहे. 

स्मृती मंचच्या वतीने वडगाव येथे बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. राम आपटे होते. मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील,  नगरसेवक विजय पाटील, एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, टी. के. पाटील, नगरसेवक पंढरी परब, किरण सायनाक, रतन मासेकर आदी दोन्ही गटांकडून उपस्थित होते. मात्र, मुख्य म्होरक्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आश्‍वासन देऊनही पाठ फिरविली. यामुळे सुमारे दोन तास चर्चा करूनदेखील कोणताही निर्णय होऊ शकला नाही. 

यावेळी महादेव चौगुले, राजेंद्र मुतकेकर, ईश्‍वर लगाडे, प्रदीप मुरकुटे, नारायण खांडेकर, युवराज हुलजी, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, संजय मोरे, सुनील जाधव, एम. वाय. घाडी, पीयूष हावळ, बी. ओ. येतोजी, मनोहर देसाई, डॉ. मिलिंद हलगेकर, अनिल कुट्रे, पी. एस. टपालवाले, गोविंद राउत, रवी पाटील उपस्थित होते.