Wed, Apr 24, 2019 22:00होमपेज › Belgaon › 27 रोजी खग्रास चंद्रग्रहण 

27 रोजी खग्रास चंद्रग्रहण 

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 7:57PMबेळगाव : प्रतिनिधी

येत्या शुक्रवारी 27 रोजी आषाढ पौर्णिमा असून या पौर्णिमेला  खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण भारतासह आशिया, युरोप, आफ्रिका,  ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, मध्य आणि दक्षिण अमेरिकेत ग्रहण दिसणार असल्याची माहिती पंचांगात देण्यात आली आहे.ग्रहणाचा वेधारंभ रात्री 11 वाजून 54 मि.ने सुरू होणार आहे. उत्तर रात्री 1 वा. खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. ग्रहण मध्य स्थिती  उत्तर रात्री 1 वाजून 52 पर्यंत असेल. खग्रास स्थिती समाप्ती उत्तरा रात्री 2 वा. 43 मि. व ग्रहणाची समाप्ती पहाटे 3. 47 वा. होणार 
आहे. 

ग्रहणाचे राशीपरत्वे फळ

मेष, सिंह, वृश्‍चिक, मीन या राशींना शुभफळ. वृषभ, कर्क, कन्या व धनु ? मिश्रफळ. मिथुन, तूळ, मकर, कुंभ ?अनिष्ट फळ आहे. ग्रहणाचा वेधारंभ रात्री पावणे बारानंतर होणार असल्याने ग्रहणाविषयक अधिक नियम पाळण्याची आवश्यकता नाही.