Sun, May 26, 2019 13:26होमपेज › Belgaon › बेळगुंदीत रविवारी साहित्य संमेलन

बेळगुंदीत रविवारी साहित्य संमेलन

Published On: Dec 08 2017 1:36AM | Last Updated: Dec 07 2017 8:44PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी आयोजित 12 वे मराठी साहित्य संमेलन बेळगुंदी येथे रविवार दि. 10 रोजी पार पडणार आहे. संमेलनाचे उद्घाटन आ. संजय पाटील यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी नाट्यदिग्दर्शक, लेखक अभिराम भडकमकर राहणार आहेत.

संमेलन चार सत्रात आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ व अध्यक्षीय भाषण होणार आहे. त्यानंतर व्याख्यान, कविसंमेलन, जादूचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. दुसर्‍या सत्रात व्याख्यान होणार असून यामध्ये ‘साहित्य संमेलने आणि मराठी माणूस’ या विषयावर प्रा. वैजनाथ महाजन  तर ‘प्रकृती, संस्कृती आणि विकृती ’या विषयावर डॉ. अनिल मडके मार्गदर्शन करणार आहेत.

तिसर्‍या सत्रात ‘हुंदका कवितेचा’ हा निमंत्रित व नवोदित कवींच्या कवितांचा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थान दयासागर बन्ने  भूषविणार आहेत. शेवटच्या चौथ्या सत्रात जादूगर प्रेमानंद यांचा ‘जादूचा गाव’ हा कार्यक्रम होणार आहे.

स्वागताध्यक्ष म्हणून ज्योतीकुमार फगरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी देवाप्पा शिंदे, अ‍ॅड नामदेव मोरे, विठ्ठल बागिलगेकर, रमेश धुरी, चंद्रकांत पाटील, शांताराम सदावरकर, पुंडलिक जाधव यांच्याहस्ते विविध प्रतिमांचे पूजन होणार आहे.

दीपप्रज्वलन ग्रा. पं. अध्यक्ष शिवाजी बोकडे, ता. पं. सदस्या गीता ढेकोळकर, निंगाप्पा जाधव, प्रेमानंद गुरव, प्रकाश पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. नामदेव गुरव यांच्याहस्ते रवळनाथ मूर्ती पूजन होणार आहे. अ‍ॅड सुधीर चव्हाण, मनोहर मोरे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात येणार आहे. शिवाजी सुंठकर, मनोहर मोरे यांच्याहस्ते पालखीपूजन, संभाजी महाराज पुतळा पूजन दामोदर मोरे, हुतात्मा स्मारक पूजन सचिन गोरले, तानाजी पावशे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. डॉ. भीमराव गस्ती प्रवेशद्वाराचे उद्घाटन मनोज पावशे, साहित्य नगरीचे उद्घाटन प्रकाश शिरोळकर, सभागृहाचे उद्घाटन कॅप्टन मुकुंद किल्लेकर, व्यासपीठाचे उद्घाटन  ता. पं. सदस्य नारायण नलवडे यांच्या हस्ते तर अंकाचे प्रकाशन अनिल कुकडोळकर, शरद पाटील यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, लक्ष्मी ढौल, जगनाथ हुलजी, गुलाम सनदी, भाऊराव गडकरी, किशोर पाटील, रतन मासेकर, जि. पं. सदस्य मोहन मोरे आदी उपस्थित राहणार आहेत. आंद्रू गामा यांच्यावतीने स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.