Tue, Apr 23, 2019 01:34होमपेज › Belgaon › लिंगायत महासभेचा काँग्रेसला पाठिंबा

लिंगायत महासभेचा काँग्रेसला पाठिंबा

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 08 2018 10:47PMबंगळूर : प्रतिनिधी

विधानसभेची निवडणूक 35 दिवसांवर आहे. प्रत्येक राजकीय पक्ष लिंगायत धर्माचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र, जागतिक लिंगायत महासभेने आपला पाठिंबा काँग्रेसला जाहीर केला आहे. कर्नाटकात सर्वाधिक मते लिंगायत समाजाची आहेत. त्यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो.

शहरातील बसवभवनमध्ये जागतिक लिंगायत महासभेची बैठक घेण्यात आली.  भाजप लिंगायतांविरुद्ध कटकारस्थाने करीत आहे, असा दावा करून त्यांचा पराभव करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.  

केंद्र सरकारने अद्याप लिंगायत धर्माला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्याबद्दल महासभेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्य सरकारने लिंगायत धर्माला धार्मिक अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात यावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मंत्रिमंडळाकडे  शिफारस करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या विषयावर सकारात्मक प्रयत्न  केले जाणार असून यापुढे कायदेशीर लढा देण्याचा निर्धारही करण्यात आला. कर्नाटक मंत्रिमंडळाने मार्च महिन्याच्या आरंभी वीरशैव-लिंगायतांना धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.

Tags : belgaum, belgaum news, Lingayat Mahasabha, Congress support,