Fri, Nov 16, 2018 01:17होमपेज › Belgaon › लिंगायत हा हिंदू पंथच!

लिंगायत हा हिंदू पंथच!

Published On: Jun 21 2018 1:26AM | Last Updated: Jun 21 2018 1:26AMबंगळूर : प्रतिनिधी

लिंगायत हा स्वतंत्र धर्म नसून तो हिंदू धर्मातील एक पंथ असल्याचे केंद्र सरकारने आपल्या प्रतिप्रतिज्ञापत्रात  (काऊंटर अ‍ॅफिडेव्हिट) म्हटले आहे. यासाठी केंद्राने काही दाखलेही दिले आहेत.

वीरशैव/ लिंगायत पंथ हा हिंदू धर्माचाच भाग असून तो स्वतंत्र धर्म नसल्याचे प्रतिप्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यतेसाठी चळवळी सुरू आहेत. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता मिळावी, या मागणीसाठी  कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाने पॅनेल नेमले आहे. त्याविरोधात याचिका सादर झाल्या आहेत. त्यात केंद्राने आपले प्रतिप्रतिज्ञापत्र सादर केले. या पार्श्‍वभूमीवर केंद्राचे प्रतिप्रतिज्ञापत्र महत्वपूर्ण ठरते. 

2011 मध्ये रजिस्ट्रार जनरल आणि गणती आयुक्तांनी सर्वेक्षण केले होते. त्यानुसार लिंगायत/वीरशैव लिंगायत पंथाचा समावेश हिंदू धर्मात केला होता, असा दाखला केंद्राने दिला आहे. 1992 च्या राष्ट्रीय अल्पसंख्याक कायद्यान्वये कोणत्याही पंथाला धार्मिक अल्पसंख्याकाची मान्यता देण्याबाबतचे निकष नाहीत. अशी मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारची विविध मंत्रालये किंवा विभाग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि इतर संस्थांचा विचार लक्षात घेणे आवश्यक असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.