Thu, Nov 22, 2018 17:01होमपेज › Belgaon › बारा कोटी मुले गिरवताहेत धडे

बारा कोटी मुले गिरवताहेत धडे

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 12 2018 10:52PM.बेळगाव : प्रतिनिधी

राज्यात पहिली ते दहावीपर्यंतची विद्यार्थ्यांची संख्या 12 कोटी 6 लाख 95 हजार 148 िआहे.  त्यापैकी बेळगाव जिल्ह्यात 3 लाख 74 हजार विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. तर चिकाडी शैक्षणिक जिल्ह्यात  4 लाख 70 हजार विद्यार्थी पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत.

राज्यात मंगळवारी पहिली ते नववीपर्यंतचा निकाल लागला. आता दहावीच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात पहिली ते दहावीपर्यंत एकूण 8 लाख 44 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची नोंद सरकारी दरबारी आहे. यामध्ये मराठी, कानडी, उर्दू व इंग्रजी माध्यामाच्या विद्यार्थ्यांचा सामावेश आहे.   

यंदा बेळगावात  मराठी माध्यामाच्या 46 व कानडी माध्यमाच्या 33  व उर्दू माध्यमाच्या 13  हायस्कूलमधून दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली. बेळगाव जिल्ह्यात एकून  मराठी माध्यमाची 404  हायस्कूल असून कन्नड माध्यमाची 1168 तर उर्दू माध्यमाची 154 हायस्कूल आहेत. प्राथमिक मराठी शाळेला आठवीचा वर्ग जोडल्यामुळे माध्यमिक शाळेत दोन वर्ग कार्यरत आहेत. इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल असला तरी सरकारी शाळेत प्रवेश मुलांनी घ्यावा म्हणून शाळा प्रवेश अभियाना राज्यात शिक्षक राबवीत आहेत.

Tags :  Lessons,r growing, 12 million, children,belgaon news