Tue, Jun 25, 2019 15:45होमपेज › Belgaon › कडोली येथे आज होणार शिवपुतळ्याचे लोकार्पण

कडोली येथे आज होणार शिवपुतळ्याचे लोकार्पण

Published On: Jan 12 2019 1:31AM | Last Updated: Jan 12 2019 1:31AM
बेळगाव : प्रतिनिधी

कडोलीत शनिवारी छत्रपती शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. 

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होणार असून, माजी मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या हे प्रमुख पाहुणे असतील. सुमारे एक कोटी रुपये खर्चून कडोलीत शिवपुतळा उभारण्यात आला आहे. त्याचे बहुप्रतीक्षित लोकार्पण शनिवारी दुपारी 12 वा. होईल. त्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांचे वंशज खा. उदयनराजे भोसले हेही निमंत्रित असून, अध्यक्षस्थानी वनमंत्री सतीश जारकीहोळी असतील. पुण्याचे वसंत गोसावी मुख्य वक्‍तेअसतील.  

सोहळ्यासाठी खा. पवार यांचे बेळगावला सांबरा विमानतळावर आगमन 11.15 वा. होईल. दु. 12 ते 1.30 पर्यंत कडोली येथे होणार्‍या पुतळा लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 1.30 ते 2.15 वा. यशोधन कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत. तेथून ते खासगी विमानाने कोल्हापूरकडे रवाना होतील.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे बंगळूर विमानतळावरून सकाळी 10.45 वा. प्रयाण होणार आहे. 12.05 वा. हुबळी विमानस्थानकावर आगमण होईल. तेथून कडोली येथे तेथे वाहनांने 1.45 वा आगमन होणार आहे. 4 वा. यमकनमर्डीला जातील.. त्यानंतर ते हुबळीकडे रवाना होणार आहेत.

सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. सिद्धराम स्वामींची उपस्थिती सोहळ्याला असेल.