Wed, Apr 24, 2019 21:34होमपेज › Belgaon › जमिनीची माहिती आता मोबाईलवर : ‘महसूल’चा उपक्रम

जमिनीची माहिती आता मोबाईलवर : ‘महसूल’चा उपक्रम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील कोणत्याही कोपर्‍यात असणार्‍या मालमत्तेची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. महसूल खात्याने ‘दिशांक अ‍ॅप’ विकसित केले असून मोबाईलच्या माध्यमातून जमिनीची माहिती मिळू शकणार आहे. यामध्ये 70 लाख सर्व्हे नंबरची माहिती उपलब्ध आहे.

मोबाईलद्वारे कोणत्याही जमिनीची माहिती मिळविणे सहजशक्य होणार आहे. अ‍ॅपमुळे जमिनीसंदर्भातील सर्व प्रकारची माहिती मिळविता येणार आहे. गायरान, तलाव, नदी, नाला, सरकारी जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे का? सर्व्हे नंबर किती? या प्रकारची माहिती मिळविता येणार आहे.

महसूल खात्याकडे उपलब्ध असणार्‍या 1960 च्या नकाशाच्या साहाय्याने अ‍ॅप तयार केले आहे. यामध्ये 70 लाख सर्व्हे नंबरांचा समावेश आहे. या माध्यमातून जमिनीवर झालेले अतिक्रमण व मूळ मालक शोधून काढणे शक्य होणार आहे.

जमिनीसंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयांना मारावे हेलपाटे यामुळे वाचणार आहेत. अ‍ॅपच्या माध्यमातून मिळालेली माहिती केवळ नागरिकांच्या उपयोगासाठी वापरता येणार आहे. याचा वापर अधिकृत कागदपत्रांसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.

जमीन खरेदी-विक्री करताना प्राथमिक माहितीसाठी या अ‍ॅपचा उपयोग होणार आहे. जमिनीच्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठीही  वापर करता येणार आहे. येत्या काळात यामध्ये सुधारणा करण्यात येणार असून सर्र्व्हेे नंबरच्या जमीन मालकाची माहिती त्यामध्ये नमूद करण्यात येणार आहे.

असा करा अ‍ॅपचा वापर

स्मार्टफोनच्या गुगल प्लेस्टोअरमधून ‘दिशांक अ‍ॅप’ डाऊनलोड करून घ्यावे. जीपीएस सेटिंग आणि गुगल मॅपच्या माध्यमातून लोकेशन माहिती नमूद करा. यानंतर अ‍ॅप सुरू करताच जागेची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. सर्व्हेनंबर माहीत असल्यास त्याची नोंद केल्यास जागेची माहिती मिळू शकते.

 

Tags : belgaon, belgaon news, Revenue Department, Land Information, Mobile,


  •