Sun, Aug 25, 2019 12:21होमपेज › Belgaon › कोरोचीच्या युवकाची निपाणीत आत्महत्या

कोरोचीच्या युवकाची निपाणीत आत्महत्या

Published On: Aug 01 2018 1:21AM | Last Updated: Aug 01 2018 12:10AMनिपाणी : प्रतिनिधी

कोरोची (ता. हातकणगले) येथील रहिवाशी अनिल प्रकाश बागडी (वय 25) या युवकाने निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

अनिल बागडी हा व्यवसायाने गवंडी व चटई विक्रेता होता.शहराबाहेरील आश्रयनगर येथील परशराम बागडी यांची मुलगी गंगुबाई हिच्याशी दीड वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. चार दिवसापूर्वी तो आपल्या पत्नीसह सासरवाडीला मरगुबाई यात्रेसाठी आला होता.  पण सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गावाकडे जावून येतो, असे सांगून तो घराबाहेर बाहेर पडला होता.

रात्री उशिरापर्यंत तो कोरोचीत न पोहचल्याचे कळून आले. मित्राकडे थांबला असेल, असा सासरसह त्याच्या कुटूंबियांचा भ्रम झाला. मंगळवारी सकाळी शाहूनगर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय उघडल्यानंतर साफसफाई करताना कर्मचार्‍याच्या नजरेत हा प्रकार  दिसून आला. घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली.

सीपीआय किशोर भरणी, ग्रामीणचे फौजदार निगनगौडा पाटील, साह. फौजदार एम. जी. निलाखे, आर. बी. शेख, हवालदार राजू कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली.भिंतीवरून उडी मारून अनिल बागडीने हे कृत्य केल्याचे लक्षात आले. नागरिकांनी मृताची ओळख पटविली. त्यानुसार पत्नी गंगुबाई व सासरा परशराम याच्या उपस्थितीत पोलिसांनी पंचनामा केला.