Sun, Aug 25, 2019 23:26होमपेज › Belgaon › ‘कोपर्डी’ निकालाचेे बेळगावात स्वागत

‘कोपर्डी’ निकालाचेे बेळगावात स्वागत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

कोपर्डी अत्याचार प्रकरणी न्यायालयाने नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाचे बेळगावात जोरदार स्वागत करण्यात आले. सकल मराठा समाजासह अनेक युवक संघटनांनी स्वागत केले. न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून बलात्कार्‍यांना त्वरित फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. वार्ताफलकावर मजकूर लिहून स्वागत करण्यात आले.

न्यायालयाने बुधवारी याप्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय देऊन तिघांना फाशी सुनावली. याचे बेळगावात स्वागत करण्यात आले. या निर्णयाची अमलबजावणी करण्यात यावी. अनेक ठिकाणी झालेल्या बलात्काराच्या घटनांमध्ये नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशा प्रतिक्रिया व्यक्‍त झाल्या.  गांधीनगर मित्रमंडळ युवक संघटनेने फलकावर मजकूर लिहून निर्णयाचे स्वागत केले. नागेश निर्मळकर, सूरज कणबरकर, राजू मुतगेकर, रवी तुक्‍कार, संतोष कटारे, सृजन सावंत, प्रकाश मुतगेकर, सहादेव जांभळे, किरण यमण्णावर, सदानंद आडे आदी उपस्थित होते.  याच घटनेवर शिवजयंतीवेळी मंडळाने चित्ररथ सादर केला होता. 

बेळगावातही मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये फाशी देण्याची मागणी केली होती.