होमपेज › Belgaon › सीमाभागामधील विद्यार्थ्यांना दिलासा

सीमाभागामधील विद्यार्थ्यांना दिलासा

Published On: Jan 23 2018 1:16AM | Last Updated: Jan 23 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक (एमकेबी) कोट्यातून महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षणणासाठी प्रवेश घेण्यासाठी लागणार्‍या रहिवासी (डेमोसाईल)  दाखल्याची अट शिथील करण्यात आली आहे. या निर्णयामुळे  सीमाभागातील 865 मराठी भाषिक गावांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी एमकेबी कोट्यातून सहज प्रवेश मिळणार असून दाखला मिळवण्यासाठी लागणारा त्रास वाचणार असल्याचे राज्याचे महसुल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ना. पाटील म्हणाले, सीमाभागातील 865 मराठी भाषिक गावांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी एमकेबी कोट्यातून महाराष्ट्रात सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी 8 व बीडीएससाठी 2 विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आरक्षण आहे. महाराष्ट्र शासनाने खास बाब म्हणून दिलेल्या आरक्षणाचा लाभ अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थी घेत आहेत. महाराष्ट्रात पदव्युतर वैद्यकीय शिक्षणासाठी पीजी-नीट परीक्षेतील गुणवत्तेनुसार एमडी, एमएस, एमडीएस आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळतो. यासाठी रहिवासी दाखल्याची अट होती. रहिवासी दाखला मिळवण्यासाठी सीमाभागातील या पालक व विद्यार्थ्यांची दमछाक होत होती. जिल्हाधिकारी व तसेच प्रांतधिकारारी कार्यालयातून दाखले मिळवण्यात अडवणूक होत होती. अनेक वेळा हे दाखले मिळत ही नसत. त्यामूळे  अनेकांना प्रवेशापासून वंचित राहावे लागत होते.