Wed, Jun 03, 2020 08:18होमपेज › Belgaon › ‘पद्मावत’ सुतळी बॉम्बप्रकरणी खानापूरच्या युवकाला अटक

‘पद्मावत’ सुतळी बॉम्बप्रकरणी खानापूरच्या युवकाला अटक

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 15 2018 11:29PMबेळगाव : प्रतिनिधी

पद्मावत  चित्रपट बेळगावात प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रकाश चित्रपटगृहाच्या आवारात सुतळी बॉम्ब फेकल्याच्या संशयावरून पोलिसांनी संभाजी मारुती पाटील (वय 28, रा. हलकर्णी, ता. खानापूर) या युवकाला अटक केली आहे. तर आणखी दोघांचा शोध सुरू आहे.संभाजी याच्यावर सामाजिक शांतता बिघडवण्याबरोबरच बेकायदा जमाव  जमवून दहशत माजवण्याचा प्रयत्न हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

25 जानेवारी रोजी शेवटच्या खेळाआधी  दोघा दुचाकीस्वारांनी प्रकाश थिएटरच्या आवारात प्रेक्षकांच्या गर्दीत पेट्रोल बॉम्ब फेकून पलायन केले होते. त्यामुळे काही काळ दहशत माजली होती; मात्र परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधितांची छबी व दुचाकी क्रमांक नोंद झाला होता. त्यावरून तपास हाती घेतल्यानंतर त्याचे खानापूरशी कनेक्शन असल्याचे दिसून आले. दोन दिवसांपासून डीसीआयबी पोलिसांचे पथक खानापुरात तळ ठोकून होते.

स्थानिक पोलिसांनाही त्यांनी अंधारात ठेवले होते. बुधवारी पहाटे हलकर्णी येथून संभाजीला ताब्यात घेऊन बेळगावला आणण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली असून याबाबत पोलिस यंत्रणा तपास करत आहे. सामाजिक शांतता बिघडविण्याचा हेतू असण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे.