Fri, Jul 19, 2019 18:20होमपेज › Belgaon › हुतात्मा दिनी अभिवादनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा 

हुतात्मा दिनी अभिवादनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा 

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:15PM

बुकमार्क करा
खानापूर : प्रतिनिधी

बुधवार दि. 17 रोजी हुतात्मा दिनाच्या अभिवादनात मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खानापूर तालुका म.  ए.  समितीचे अध्यक्ष माजी आ. दिगंबर पाटील यांनी केले. तालुका म. ए. समितीची बैठक शनिवारी शिवस्मारकात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना  ते म्हणाले,  सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्‍न अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशा क्षणी मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मतभेद बाजूला सारुन केवळ सीमाप्रश्‍नाची सोडवणूक हा विचार मनात रुजवला तर कसलीही आमिषे मनाला शिवणार नाहीत. यासाठी सर्वांनी दक्ष राहण्याची गरज आहे.

माजी अध्यक्ष पुंडलिक चव्हाण म्हणाले, समितीतील पहिल्या पिढीपासून चळवळीचा अनुभव घेतला आहे. आज तिसर्‍या पिढीच्या खांद्यावर सीमाचळवळीची जबाबदारी देताना शिस्त आणि संयमाची शिकवण देणे गरजेचे आहे. चढ-उतार ही समितीसाठी नवीन बाब नसून सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीपर्यंत भगव्या झेंड्याशी इमानाने वागावे. माजी अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले. नारायण कापोलकर यांनी आभार मानले. यावेळी यशवंत बिर्जे, आबासाहेब दळवी, विवेक गिरी, महादेव घाडी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, अनिल पाटील, जि. पं सदस्य जयराम देसाई, बी. बी. पाटील यांचीही भाषणे झाली.

यावेळी करवेचा नारायण गौडा व कन्नडसक्‍ती लागू करण्याचा फतवा काढलेे जिल्हाधिकारी एस. झियाऊल्ला यांच्या मराठीद्वेष्टेपणाचा निषेध करण्यात आला. प्रयोगशील शेतीबद्दल ओलमनीचे समितीचे ज्येष्ठ नेते वसंत नावलकर यांना कृषीखात्याचा कृषीमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष दिगंबर पाटील यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  सभेला नारायण लाड, नारायण पाटील, प्रवीण पाटील, के. पी. पाटील, विठ्ठल गुरव, शामराव पाटील, मर्‍यापा पाटील, अमृत पाटील, गणपती पाटील, तातोबा पाटील, मधुकर पाटील, दशरथ पाटील, हणमंत पाटील, दीपक देसाई, देवाप्पा भोसले, कल्लापा घाडी, रुक्माण्णा झुंजवाडकर, रमेश धुरी, रमेश देसाई, रामचंद्र चौगुले, राजाभाऊ देशपांडे, गणपत गावडे आदी उपस्थित होते.