Tue, Sep 25, 2018 16:28होमपेज › Belgaon › खानापूर कंत्राटदार संघटनेची 24 रोजी बैठक

खानापूर कंत्राटदार संघटनेची 24 रोजी बैठक

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 8:59PMखानापूर : प्रतिनिधी      

खानापूर तालुका सरकारी कंत्राटदार संघटनेची बैठक बुधवार दि. 24 रोजी  सकाळी 10.30 वा. बांधकाम विभागाच्या विश्रामधाममध्ये बोलावण्यात आली आहे. स्थानिकांना डावलून तालुक्याबाहेरील कंत्राटदारांना कामांचे वाटप केले जात आहे. वारंवार यासंदर्भात तक्रार करूनही जि. पं. उपविभाग आणि बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष चालविले आहे. स्थानिक कंत्राटदारांना कामाअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा करून अभियंत्यांना निवेदन देण्यात येणार आहे. बैठकीला सर्व कंत्राटदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सुभाष चलवादी आणि सचिव मल्लिकार्जुन मुतगी यांनी केले आहे.