Thu, Apr 25, 2019 03:41होमपेज › Belgaon › ‘पुढारी’च्या वर्धापन दिनी खानापुरात रंगला स्नेहमेळावा

‘पुढारी’च्या वर्धापन दिनी खानापुरात रंगला स्नेहमेळावा

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:40PM

बुकमार्क करा
खानापूर : प्रतिनिधी

वाचक-हितचिंतकांची अखंड लागलेली रिघ, तालुक्याच्या विविध विषयांवर प्रकाश टाकणार्‍या विधायक गप्पांची मैफल आणि निर्भिड पत्रकारितेबद्दल जनसामान्यांतून होणारे कौतुक अशा प्रफुल्लित करणार्‍या वातावरणात खानापुरात दै. पुढारीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

प्रारंभी पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी जि. पं सदस्य बाबुराव देसाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, प्रमोद कोचेरी, राज्य महिला मोर्चा सचिव धनश्री सरदेसाई आदींच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

सर्वसामान्यांच्या व्यथा, वेदना आणि प्रश्‍नांचे दै. पुढारीने असेच नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पुढारीचे वाचक, हितचिंतक आणि सर्व थरातील मान्यवरांच्या उपस्थितीत शिवस्मारकाच्या माजी आ. व्ही. वाय. चव्हाण सभागृहात रंगलेला स्नेहमेळावा सर्वांसाठीच  पर्वणी ठरला. व्हिजन न्यू-इंडिया या विशेषांकाचेही मान्यवरांनी कौतुक केले. 

शेकडो वाचक व हितचिंतकांनी उपस्थित राहुन पुढारीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी आ. अरविंद पाटील, नगराध्यक्ष अजीम तेलगी, उपनगराध्यक्ष नारायण मयेकर, तालुका म. ए. समिती अध्यक्ष माजी आ. दिगंबर पाटील, बालभवन मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अंजलीताई निंबाळकर, खानापूर को-ऑप बँकेचे चेअरमन डॉ. सी. जी. पाटील, ज्येष्ठ संचालक बाबुराव चित्रगार,  जि. पं सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर, ता. पं. सदस्य पांडुरंग सावंत, बाळासाहेब शेलार, कृष्णा कुंभार, मारुती कोडचवाडकर, संभाजीराव पाटील, आबासाहेब दळवी, वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. ईश्‍वर घाडी, माजी ता. पं. सदस्य महादेव घाडी, यशवंत बिर्जे, राजेश पाटील, वाघू पाटील, माजी जि. पं. सदस्य पुंडलिक कारलगेकर, प्रकाश चव्हाण, जॉर्डन गोन्साल्विस, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते आबासाहेब दळवी, निवृत्त सुभेदार गोपाळ देसाई,  

प्रकाश देशपांडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष पिराजी कुर्‍हाडे, प्रसन्ना कुलकर्णी, चेतन लक्केबैलकर, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, उपाध्यक्ष विवेक गिरी, उद्योजक सॅवियो परेरा, भाजप शहर प्रमुख राजेंद्र रायका, रवी काडगी, खानापूर कृषीपत्तीनचे व्यवस्थापक दत्ता बेळगावकर, माजी ता. पं सदस्या धनश्री सरदेसाई, खानापूरचे वनक्षेत्रपाल एस. एस. निंगाणी, शिवस्मारक ट्रस्टचे  बी. बी. पाटील, श्रीकांत दामले, क्रांतीसेनेचे महादेव मरगाळे, ब्रम्हानंद पाटील, अनंत पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ, निळू पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख दयानंद चोपडे, साईकृष्ण सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. पी. पाटील, नगरसेविका सुनीता मयेकर, पीएसआय परशराम पुजारी, के. आय. पाटील, श्रीरामसेना प्रमुख पंडित ओगले, सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष तातोबा पाटील,

शंकर गावडा, किरण येळ्ळुरकर, केडीपी सदस्य प्रकाश पाटील, लायन्स क्‍लबचे अशरफ नाईक, अजित पाटील, अंजलीताई फाऊंडेशनचे विनायक पाटील, सूर्यकांत कुलकर्णी, परशराम र्‍हाटोळकर, निजदचे महांतेश राऊत, रमेश देसाई, ए. बी. मुरगोड, माजी ता. पं सदस्य विठ्ठल गुरव, अविनाश पाटील, इरय्या होसमठ, डी. एम. भोसले, ए. आर. भोसले, सतीश पाटील, अनिल पाटील, राजू पडणेकर, वृत्तपत्र विक्रेते सुरेश खडपे, प्रियांका कोलेकर, श्रीधर मुतगेकर, गुंडू तोपिनकट्टी, शेखर पाटील, सर्वज्ञ कपिलेश्‍वरी, इरफान तालिकोटी, एम. पी. गिरी, ईश्‍वर बोबाटे, प्रल्हाद मादार, गजानन पाटील, शिवा मयेकर,  विनायक कुंभार, बाबाण्णा पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, मिलींद शेलार, यल्लापा चिनवाल, जॅकी फर्नांडिस, रोमेल अंद्रादे, रामा साळुंखे, रामा मादार आदींनी शुभेच्छा दिल्या.

दै. पुढारी परिवाराच्यावतीने युनिट मॅनेजर बाळासाहेब नागरगोजे, निवासी संपादक गोपाळ गावडा यांनी स्वागत केले.