होमपेज › Belgaon › पैशांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर नजर ठेवा

पैशांच्या बेकायदेशीर व्यवहारांवर नजर ठेवा

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 10 2018 11:31PMबेळगाव : प्रतिनिधी       

निवडणूक काळात बेकायदेशीरपणे होण्यार्‍या   पैशाच्या व्यवहारावर करडी नजर  ठेवावी. उमेदवाराच्या बँकींग व्यवहाराची माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडे द्यावी, अशा काही महत्त्वाच्या सूचना  जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी एस.जियाउल्ला यानी बँक अधिकार्‍यांना केल्या. 

निवडणूक आयोगाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित  बँक अधिकार्‍यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून जियाउल्ला बोलत होते.

विनाकागदपत्रे किंवा विनादाखले पैशांची वाहतूक प्रकाराची निवडणूक आयोगाकडून गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे. पैशांच्या संशयास्पद व्यवहारांवर बँकांनी नेहमी सतर्क राहावे. विधानसभा निवडणूक काळात पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. रोकडची वाहतूक तसेच बँकेच्या प्रत्येक व्यवहारासंबंधी बँकांकडे पुरावे असणे आवश्यक आहे. एटीएमकडे पैसे नेत असताना बँकांकडे त्यासंबंधिची कागदपत्रे असावीत. कायदपत्रे नसल्यास रोकड जप्त करण्यात येईल. निवडणूक मुक्त वातावरणात व सुरळीतपणे होण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न असून याला बँकांकडून सहकार्य मिळायला हवे, असे जियाउल्ला म्हणाले.

एखादी व्यक्ती 50 हजारांहून अधिक रक्कम घेऊन जात असल्यास त्याच्याकडे त्यासंबंधीची कायदपत्रे असायला हवीत नहून रक्कम जप्त करण्यात येईल, असा इशाराही त्यानी दिला.

निवडणूक काळात प्रत्येक व्यवहार हा चेक किंवा आरटीजीएसद्वारे व्हावा. उमेदवाराचा पती किंवा पत्नी अथवा उमेदवाराचा वारसदाराच्या बँक खात्यावर लाख रु.हून अधिक रक्कम जमा असल्यासंबंधी निवडणूक आयोगाला माहिती देणे बँकांना बंधनकारक आहे. जिल्हा किंवा संबंधित विधानसभा मतदारसंघात एकाच बँकेकडून  अनेकांच्या बँक खात्यावर एकाचवेळी आरटीजीएसद्वारे रोकड ट्रान्स्फर केल्याची माहिती बँकांनी निवडणूक आयोगाकडे द्यावी. कोणत्याही राजकीय पक्षाचे खाते लाखाहून अधिक रकमेचा व्यवहार करीत असल्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी. रोकडची वाहतूक करणारे वाहन, कर्मचारी व एटीएमची देखरेख करणार्‍या व्यक्तीसंबंधी बँकांनी निवडणूक अधिकार्‍यांना सविस्तर माहिती द्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या.  नोडल अधिकारी रमेश कळसद यांसह विविध बँकांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

  उमेदवारांच्या खात्यावर लक्ष राहणार   
उमेदवार व त्यांच्या कुटुंबाच्या खात्यावरील व्यवहारावर बँकांनी लक्ष ठेवावे.निवडणुकीच्या निमित्ताने जमा व खर्च नोंदीसाठी उमेदवाराचे स्वतंत्र खाते असावे. आयोगाने प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 28 लाख रु.निश्‍चित केली आहे. यापैकी 20 हजार रु. पर्यंतचा व्यवहार रोखीने करता येणार आहे.