Thu, Sep 20, 2018 17:03होमपेज › Belgaon › कर्नाटकाचा अर्थसंकल्प सादर होणार 5 जुलैला

कर्नाटकाचा अर्थसंकल्प सादर होणार 5 जुलैला

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 12:00AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकात नवे सरकार स्थापन झाले असून नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प येत्या 5 जुलै रोजी मांडला जाणार आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा याचा अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. 
2006 मध्ये राज्यात भाजप-निजद युती सरकार असताना पहिल्यांदा कर्जमाफी करण्याचा मान तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना जातो. आता दुसर्‍यांदा कर्जमाफी झाल्यास त्याचे श्रेयही कुमारस्वामी यांनाच मिळणार आहे. 

कर्जमाफी तसेच इतर खात्यांचे उत्पन्न आणि खर्च याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी गुरूवार 14 जून रोजी महसूल विभागातील सचिवांची बैठक बोलाविली आहे. त्यानंतर इतर अधिकार्‍यांची अर्थसंकल्पपूर्व बैठक घेतली जाईल. अर्थसंकल्पाची रुपरेषा या बैठकांमधून आखली जाणार आहे. 

सिद्धरामय्यांनी मुख्यमंत्रीपदी असताना गेल्या 1 फेब्रुवारी रोजी पूर्ण अर्थसंकल्प न मांडता 4 महिन्यांसाठी लेखानुदान मंजूर करून घेतले होते. आता 5 जुलै रोजी पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल. अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा झाल्यास बेळगाव जिल्ह्यातील 3 लाख 58 हजार शेतकर्‍यांना लाभ मिळणार आहे. त्यांच्यावर 1501 कोटी रुपयांचे कर्ज आहे.