Sat, Aug 24, 2019 22:03होमपेज › Belgaon › प्रतीक्षा निकालाची !

प्रतीक्षा निकालाची !

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 12:46AMबेळगाव : प्रतिनिधी

मंगळवार दि. 15 मे रोजी बेळगावात होणार्‍या आरपीडी महाविद्यालयातील मतमोजणी प्रक्रियेला सकाळी  आठ  वाजल्यापासून प्रारंभ होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 18 मतदार संघाचे चित्र स्पष्ठ होणार आहे.  पहिल्यांदा पोस्टाने झालेल्या मतदानाची मोजणी होणार असून त्यानंतर मतदार संघाप्रमाणे मतमोजणी करण्यात येणार आहे.

आरपीडी महाविद्यालयामध्ये नवीन इमारत, परुळेकर इमारत, लॅब्रोटरी इमारत, घाटगे इमारत, ग्रंथालय इमारत, बीबीए इमारतीमधील मिळून  तीन मजल्याचा वापर मतदान मोजणीसाठी करण्यात येणार आहे.एकून 36 बंदीस्त खोल्यात मतदानयंत्रे कडक बंदोबस्तात ठेवण्यात आली असून 18 खोल्यामध्ये मतमोजणी प्रक्रीया पार पडणार आहे. 

जिल्ह्यातील  18 मतदारसंघातील 203 उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे लक्ष निकालाकडे लागून राहीले आहे. जिल्ह्यातील 891 मतदान केंद्रातील मतदान यंत्रे आरपीडी महाविद्यालयात सीमा सुरक्षा दल व निवडणूक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आली आहेत. महाविद्यालयातील तीन इमारती मतमोजणी केंद्रासाठी वापरण्यात येणार आहेत.

रायबाग मतदारसंघापासून मतमोजणीला प्रारंभ होणार असून अनुक्रमे यमकनमर्डी, बैलहोंगल, कागवाड, हुक्केरी, खानापूर, निपाणी, रामदुर्ग, सौंदत्ती, अथणी , बेळगाव दक्षिण,कुडची, कित्तूर, अरभावी, बेळगाव उत्तर, गोकाक, चिकोडी, बेळगाव ग्रामीण अशी मतमोजणी होणार आहे.  

मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेर्‍याची कडक नजर आहे. यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी तनि मोठ्या स्क्रीनवर पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या बंदोबस्तात मतमोजणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची एकावेळी एकच मतदान यंत्राची मोजणी होईल. बीएसएनलची ब्रॉडबँड सेवा 46 ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी सीमासुरक्षा  दलाचे जवान दोन दिवसापासून तैनात  आहेत. 

मतमोजणी केंद्रात मोजणी निरीक्षक व सहायक,निवडणूक आयोगातील अधिकृत सेवेत असलेले अधिकारी, निवडणूकीच्या कामात सहभागी असलेल कर्मचारी, उमेदवार व त्यांचे एजंटाचा वावर असणार आहे. 16 टेबल सह आसनव्यवस्था  राष्ट्रीय पक्ष, राज्यातील पक्ष व परराज्यातील पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांना असेल. एकून मतदान केंद्रावर 41 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्यावर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र दालन केले आहे.  कोणतीही गडबड होवू नये संपूर्ण खबरदारी घेण्यात आली असून सीमा सुरक्षा दलाच्या बंदोबस्तात मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.