Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Belgaon › ‘त्रिशंकू’ आल्यास डीलमेकर कोण? 

‘त्रिशंकू’ आल्यास डीलमेकर कोण? 

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 14 2018 9:10PMमतदानोत्तर जनमत चाचणीत कर्नाटकामध्ये ‘त्रिशंकू’ स्थिती येण्याची शक्यता विविध वृत्तवाहिन्यांनी वर्तविली आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेसने सत्तासोपान सुलभ होण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. काँग्रेस साठी तुमकूरचे खा. मुद्दूहनुमे गौडा हे ‘डीलमेकर’ ठरू शकतात. मुद्दूहनुमे यांचे निजदचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्याशी उत्तम स्नेहबंध आहेत. हे लक्षात घेवूनच या दोन्ही पक्षातील मध्यस्थ म्हणून मुद्दूहनुमे हे मध्यस्थ म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडू शकतील, अशी खात्री काँग्रेस श्रेष्ठींना वाटते. 

देवेगौडा यांच्या सहाय्यामुळेच मुद्दूहनुमे यांनी कुनीगलची विधानसभा जागा जिंकली होती. त्यांनी त्यावेळी माजी मंत्री वाय. के. रामय्या या लिंगायत नेत्याचा पराभव केला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मुद्दूहनुमे यांचा पराभव झाला होता. त्यांनी ही निवडणूक निजदच्या तिकीटावर लढविली होती. डॉ. परमेश्वर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मुद्दूहनुमे यांना काँग्रेसचे तिकीट दिले होते. त्यात ते निवडून आले. ‘हा माझा राजकीय पुनर्जन्म ठरला’ अशी प्रतिक्रिया मुद्दूहनुमे यांनी दिली होती.