Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Belgaon › खानापूर ग्रामीण भागाचा कौल कोणाला ?

खानापूर ग्रामीण भागाचा कौल कोणाला ?

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 14 2018 8:40PMजांबोटी: वार्ताहर

विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासावर येवून  ठेपला असून  शहराप्रमाणे खानापूर ग्रामीण भागातही सर्वांना उत्सुकता  लागली असून कौल कोणाला याबाबत चर्चा रंगली आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये यंदाची निवडणूक अधिक रंगतदार ठरली आहे. मतदानापूर्वीच्या चार दिवसात सर्वच उमेदवारांकडून पैशाचा पाऊस पाडण्यात आल्याने कोणाच्या पारड्यात कौल, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

सर्वत्र पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याने मतांची विभागणी झाली आहे. यात विशेष म्हणजे कार्यकर्त्यांची अदला-बदल निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.  प्रत्येक गावात चुरशीने मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे उमेदवारांपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येच अधिक ईर्ष्या आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून आपल्याच नेत्याच्या विजयाचा दावा करण्यात येत आहे. 

ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा प्रचारात सहभाग लक्षणीय ठरला आहे. त्यामुळे त्याचा काही प्रमाणात फायदा होणार आहे.  काही गावांमध्ये शपथ घालण्यात आल्या असून एकेरी मतदान करण्याची हाक देण्यात आली आहे. असे असले पूर्वीच ठरलेल्या मतांची विभागणी थांबू शकली नाही. त्यामुळे कोणाला कितपत फायदा होणार, हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.