Mon, Apr 22, 2019 04:14होमपेज › Belgaon › ‘आप’ ची पहिली यादी जाहीर 

‘आप’ ची पहिली यादी जाहीर 

Published On: Mar 22 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 11:07PMबंगळूर : प्रतिनिधी

जनतेला पारदर्शक प्रशासन देण्याची घोषणा करीत विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या आम आदमी पार्टी (आप) ने राज्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार उभे करण्यात येतील, असे जाहीर केले आहे. पक्षाने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. 

आपचे राष्ट्रीय सचिव कर्नाटकाचे  पक्ष निरीक्षक पंकज गुप्ता व राज्यसभा सदस्य संजय सिंग यानी मंगळवारी  पत्रकार परिषदेत पहिली यादी जाहीर केली. उमेदवार व मतदारसंघ असे? 

पृथ्वी रेड्डी?सर्वज्ञनगर, डॉ.रेणुका  विश्वनाथ? शांतीनगर, लिंगराज अरस ? के.आर.पूर, सय्यद असद अब्बास? बीटीएम लेआऊट, एस.के.सीताराम?  बसवनगुडी, आयुब खान? शिवाजीनगर, राघवेंद्र? हेब्बाळ,  एस.जी.सिध्दगंगय्या? पुलिकेशीनगर, मोहन दासरी? सी.व्ही.रामननगर, मालविक गुब्बीवाणी? चामराज, संतोष नरगुंद? हुबळी? धारवाड मध्य,   के.एल.राघवेंद्र ? दावणगिरी दक्षिण, दीपक मालगार? बसव कल्याण, शरणप्पा हज्जीहोळ? गंगावती, बाळासाहेब रावसाहेब? कारटगी, रविकुमार? भद्रावती, चंद्रकांत रेवणकर? शिकारीपूर, आनंद हंपण्णावर? कित्तूर.

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka State Elections, AAP, Candidates,