Fri, Dec 13, 2019 01:07होमपेज › Belgaon › उद्या बहुमत सिद्ध करा; कर्नाटक राज्यपालांचे सीएम कुमारस्वामींना आदेश 

कर्नाटक : उद्या बहुमत सिद्ध करा

Published On: Jul 18 2019 9:18PM | Last Updated: Jul 19 2019 2:22AM
बेंगळुरू : पुढारी ऑनलाईन 

सरकार स्थापनेपासून राजकीय आखाडा बनलेल्या कर्नाटकमध्ये दिवसागणिक घडामोडी घडत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना उद्या (ता.१९) विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल वजुभाई वाला यांनी दिले आहेत. 

कुमारस्वामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा उद्या सकाळी ११ वाजल्यापासून विधानसभेत पुन्हा सुरु होणार आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी पत्र लिहून कुमारस्वामींना उद्या दुपारी दीड वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करा असा आदेश दिला आहे. 

दरम्यान, कर्नाटकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. कुमारस्वामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याआधीच सभागृहाचे काम तहकूब करण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या भाजप आमदारांनी बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह सभागृहात धरणे आंदोलन करून ठिय्या मांडला.    

राज्यपाल वजुभाई यांनी आजच्या दिवसातील कामकाज पूर्ण होण्याअगोदर बहुमत सिद्ध करावे असे पत्र सभापती केआर रमेश यांना पाठवले होते, पण गदारोळात सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यामुळे राज्यपालांनी आदेश देऊनही विश्वासमतावर निर्णय होऊ शकला नाही.  

अधिक वाचा : कर्नाटक विधानसभा कामकाजाला स्थगिती, राजकीय नाट्य शिगेला