Sat, Apr 20, 2019 08:03होमपेज › Belgaon › कर्नाटकी निवडणुकीने बदलावे देशाचे चित्र

कर्नाटकी निवडणुकीने बदलावे देशाचे चित्र

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:55AMनिपाणी : प्रतिनिधी

संपूर्ण देशाचे लक्ष कर्नाटकातील निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीने देशाचेही चित्र बदलावे, असे प्रतिपादन करत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केेंद्र सरकारवर निशाणा साधला. 

निपाणी येथे माजी आ. सुभाष जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, आज देशातील साखर उद्योग अडचणीत आला आहे. आपण प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून या प्रश्‍नांकडे लक्ष वेधले असून यावर नितीन गडकरी कमिटी नेमली गेली आहे.समर्थ मंडळ व्यायाम शाळेवर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योग मंत्री आर. व्ही देशपांडे होते.

पवार म्हणाले, शेतकर्‍यांना त्यांच्या घामाची किंमत मिळाली नाही तर देशाचे अर्थकारण उध्वस्त होईल संकटात सापडलेल्या या उद्योगाला उभारी देण्यासाठी राज्यकर्त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. 

कर्नाटकाने शेतकर्‍यांसाठी विविध योजना राबवून देशाला नवीन रस्ता दाखविला आहे. देशात कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या करीत आहे. आपण कृषी मंत्री असतांना मनमोहनसिंह सरकारने 71 हजार कोटी रूपयांची कर्जमाफी केली हेाती. दर व्याजाचा दर 11 टक्क्कयावरून 4 टक्के केला. काळ्या आईशी इमान राखणार्‍या घटकांची काळजी सरकारने घेतली पाहिजे, असेही पवार म्हणाले. 

काकासाहेब फार हुशार 

राज्यासह आपल्या विभागाचे राजकारण व कारभार चांगल्या प्रकारे ठेवायचा असेल तर सामान्य माणसाच्या हिताचा विचार व्हायला हवा.त्यामुळे होवु घातलेल्या निवडणुकीद्वारे काकासाहेब पाटील यांच्यासारख्या हुशार माणसाला या भागाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्या.कारण आज काकासाहेब यांनी एका म्यानात दोन तलवारी ठेवल्या आहेत.अर्थात निमित्त जरी माजी आ.प्रा.सुभाष जोशी सरांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे असले तरी पाटील यांनी या निमित्ताने आपल्याकडे मतरूपी आशिर्वाद मागितला आहे.तो आपण द्यावा,अशा माणसांच्या पाठीशी आपण ठाम राहु असे भावनीक आवाहन पवार यांनी केले. 

उद्योग मंत्री देशपांडे म्हणाले, देशाला आज निष्ठावंत आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधींची गरज आहे. शेतकर्‍यांचा आवाज केंद्रापर्यंत पोहचत नाही. अशा परिस्थितीत प्रामाणिक लोक राजकारणात आले तरच देशाची व्यवस्था बदलेल. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शरद पवार यांनी विरोधी पक्षाला एकत्र करून नेतृत्व स्वीकारण्याची जबाबदारी पार पाडावी.

काकासाहेब पाटील यांचे नशीब चांगले आहे. 1999 साली आपण काँग्रेसमध्ये गेलो असतो तर ते कोठे राहिले असते. मागील वेळी आपण पाठिंबा देतो म्हणालो होतो. माझ्या सहकाररत्न पुरस्कारामुळे काँग्रेस जिवंत करण्याचे काम आपण केले आहे. चिकोडी आणि निपाणीतील उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे प्रा. सुभाष जोशी यांनी स्पष्ट केले. 
पप्पूअण्णा पाटील, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, खा. प्रकाश हुक्केरी, माजी आ. वीरकुमार पाटील, काकासाहेब पाटील, मोहन बुडके, सतीश जारकीहोळी, आ. हसन मुश्रीफ, आ. जयंत पाटील, खा. धनंजय महाडिक यांची भाषणे झाली.

यावेळी पालकमंत्री रमेश जारकिहोळी, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव सतीश जारकिहोळी,  खा. प्रकाश हुक्केरी, खा. प्रभाकर कोरे, खा. राजू शेट्टी,  माजी मंत्री जयंतराव पाटील, खा. धनजंय महाडिक, आ. गणेश हुक्केरी,  हसन मुश्रीफ,  संध्यादेवी कुपेकर,कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, सहकारनेते रावसाहेब पाटील, माजी आ. वीरकुमार पाटील, काकासाहेब पाटील, दत्त शुगरचे चेअरमन गणपतराव पाटील, व्यकंटेश्‍वरा शुगरचे स्वरूप महाडिक, सदाशिव मंडलिक कारखान्याचे संजय मंडलिक, ए.वाय.पाटील,बिद्री कारखान्याचे के. पी. पाटील,  श्रीपतराव शिंदे, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम,प्रदीप जाधव यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. स्वागत प्रा. बाळासाहेब सुर्यवंशी यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांनी मानले.

केंद्र सरकारचे बारा वाजावयास वेळ लागणार नाही...

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीकडे संपुर्ण देशाचे लागून आहे.कारण या राज्यात सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने कष्टकरी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्यादृष्टीने अंत्यत चांगले व हिताचे असे निर्णय घेतले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा  अशा सरकारच्या हाती सत्ता मिळवुन देणे तुम्हा जनतेचे कर्तव्य आहे.तसे झाले तर संपुर्ण देशाचे चित्र बदलावयास वेळ लागणार नाही. तसे झाले तर केंद्रातील सरकारचे मी बारामतीकर म्हणून सांगतो बारा वाजावयास वेळ लागणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

 

Tags : Nipani, Nipani news, Subhash Joshi, Birthday, Karnataka Election, Change, Sharad Pawar,