होमपेज › Belgaon › आज विस्तार, सतीशना संधी

आज विस्तार, सतीशना संधी

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 11:59PMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी 6 रोजी होणार असून, मंत्र्यांची यादी मंगळवारी रात्रीपर्यंतही निश्‍चित झाली नव्हती. बुधवारी सकाळीच ती निश्‍चित होईल. बेळगाव जिल्ह्यातून सतीश जारकीहोळ्ळींचा समावेश पहिल्या यादीत असण्याची शक्यता आहे. बुधवारी एकूण 22 मंत्र्यांचा शपथविधी होईल.

मंत्र्यांना राज्यपाल वजूभाई वाला दुपारी 2 वाजता  शपथ देणार आहेत.  मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे, माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांचा मुलगा अजय सिंग यांचाही मंत्रिमंडळात समावेश असण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांना डावलून नव्या चेहर्‍यांना संधी देण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबले आहे. त्यामुळे पहिल्या यादीत आर. व्ही. देशपांडेंचे नाव नाही. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व इतर नेते राहुल गांधींशी रात्रीपर्यंत चर्चा करत होते. मंत्रिमंडळात निजदच्या 12 मत्र्यांचा व काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यासह 22 जणांचा सहभाग राहणार आहे. 

निजदचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व निजदचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हेे मंत्रिमंडळाला अंतिम स्वरूप देण्यामध्ये मग्न आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे नेतेही अ.भा. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेऊन काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी निश्‍चित करण्यामध्ये मग्न आहेत. रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती.