Tue, Aug 20, 2019 04:52होमपेज › Belgaon › निवडणूक अधिसूचना 23 रोजी

निवडणूक अधिसूचना 23 रोजी

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 11:38PMबंगळूर : प्रतिनिधी       

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची अधिसूचना पुढील आठवड्यात दि. 23 मार्च रोजी जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा केेंद्रीय निवडणूक आयुक्‍त ओ. पी. रावत यांनी नवी दिल्ली येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केली आहे. निवडणूक 7 ते 13 मे दरम्यान एकाच टप्प्यात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 23 तारखेला निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात आल्यास त्याच दिवसापासून आचारसंहिता जारी होणार आहे. पुढे 45 दिवसांनी मतदान प्रक्रिया होत असते. त्यामुळे 7 ते 13 मेदरम्यान मतदान होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा स्थळावर  निवडणुकीच्या पूर्वतयारीला  वेग आला असून जिल्हा प्रशासनाने विविध विभागांतील कर्मचार्‍यांकरवी पूर्वतयारी चालविली आहे. आता  निवडणुकीची तारीख जाहीर होणे शिल्‍लक आहे.