Thu, Jun 20, 2019 21:31होमपेज › Belgaon › कित्तूरमधून डी. बी. इनामदारच

कित्तूरमधून डी. बी. इनामदारच

Published On: Apr 23 2018 1:15AM | Last Updated: Apr 23 2018 12:10AMनवी दिल्ली : वृत्तसंस्था

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने 12 मे रोजी होणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. तीत बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर मतदारसंघातून विद्यमान आ. डी. बी. इनामदार यांनाच उमेदवारी मिळाली आहे. शिवाय मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीमधूनही लढणार यावरही आज शिक्कामोर्तब झाले. त्यासह पाच मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात आले आहेत.

पहिल्या यादीत जिल्ह्यातून फक्‍त कित्तूर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे इनामदार यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांची नाराजी दूर करत काँग्रेसने रविवारी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्‍वरी मतदारसंघातून अर्ज भरलाही आहे. ते आता बदामीमधूनही उद्या अर्ज भरतील. आधी डॉ. देवराज पाटील यांना बदामीची उमेदवारी देण्यात आली होती. ती आता रद्द झाली आहे. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीमधूनही निवडणूक लढविणार

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे चामुंडेश्‍वरी मतदार संघाबरोबरच काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार बदामी मतदार संघातूनही निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी काँग्रेस हायकमांडने त्यांना मंजुरी दिली आहे.  सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्‍वरी येथून आपला उमेदवारी अर्ज दोनच दिवसांपूर्वी दाखल केला आहे. बदामी येथून ते 23 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बदामीमधून निवडणूक लढविल्यामुळे त्याचा लाभ उत्तर कर्नाटकाला मिळणार आहे. 

Tags : Belgaum, Karnataka, Assembly Election, Kittur, constituency, D. B. Inamdar, candidature