Tue, Apr 23, 2019 02:22होमपेज › Belgaon › प्रचारासाठी वाट्टेल ते...

प्रचारासाठी वाट्टेल ते...

Published On: May 04 2018 1:53AM | Last Updated: May 04 2018 1:16AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुक प्रचाराला गती आली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध शकला लढवत आहे. प्रत्येक उमेदवार आपला प्रचार वेगळा करत आहे. हे दाखविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करीत मतदारांवर प्रभाव पाडण्याचे काम सुरु आहे. 

निवडणुकीच्या प्रचारात ताई माई अक्का, विचार करा पक्का...आवाज कुणाचा, येऊन येऊन येणार कोण, आला आला कोण आला, आता नाही तर कधी नाही आदी घोषणा लाऊडस्पीकरच्या माध्यमातून गावागावात देण्यात येत आहेत.उमेदवारांनी प्रचारासाठी हिंदी व मराठी गाण्याचा वापरही सुरु केला आहे. यामध्ये सैराट सिनेमातील झिंग झिंग झिंगाट या गाण्याचा खास उपयोग केलेला दिसून येतो. एकंदरीत मतदाराला आकर्षिक करण्यासाठी उमेदवारांनी ही युक्ती आजमावली आहे. तसेच मी...या पक्षाचा कार्यकर्ता बोलतोय तुम्ही....या उमेदवाराला मतदान करा असे फोन देखील मतदारांना येत आहेत. एकंदरीत यंदाच्या निवडणुकीत प्रचारासाठी वेगळा फंडा वापरलेला दिसून येत आहे.

निवडणुकीचा प्रचार सकाळी व संध्याकाळी अशा दोन टप्यात सुरु आहे.  मात्र, काही उमेदवारांनी दुपारच्या वेळी मतदानाच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी जुपले आहे. निवडणुक प्रचारासाठी कडक अचारसंहिता असल्याने प्रचारासाठी लागणार्‍या वाहनांची परवानगी मिळविताना अडचणी येत आहेत. प्रत्येक उमेदवारांनी आपापल्या प्रचारासाठी टेप रेकॉर्डिंग करून घेतले आहे. याद्वारे ते प्रचार करीत आहेत. प्रचारासाठी हिंदी व मराठी गाण्याचा आधार घेतला आहे. यामुळे मतदारांच्यामध्ये कुतुहलाचा विषय बनला आहे. प्रत्येक उमेदवारांनी सभांपेक्षा गल्लोगल्ली, घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर दिला आहे.