Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Belgaon › राज्यातील खासगी शाळांना कन्‍नड सक्‍ती

राज्यातील खासगी शाळांना कन्‍नड सक्‍ती

Published On: Sep 05 2018 2:12AM | Last Updated: Sep 05 2018 2:12AMबंगळूर : प्रतिनिधी

राज्यातील सर्व खासगी शाळांमधून कन्‍नड ही प्रथम व द्वितीय भाषा म्हणून सक्‍तीची करावी, असा आदेश  शिक्षण खात्याने जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना बजावला आहे. शिक्षण खात्याने आदेश गतवर्षीच जारी केला तरी बहुतांश शाळांनी आदेशाचे पालन केलेले नाही. कन्‍नड न शिकविणार्‍या शाळांची यादी शिक्षण खात्याकडे पाठवा, अशी सूचना जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना आहे.राज्याचा अभ्यासक्रम, सीएबीएसई, आयसीएमई यापैकी कोणत्याही अभ्यासक्रम शिकविणार्‍या शाळांनी  कन्‍नड शिकविणे सक्‍तीचे असल्याचे शिक्षण खात्याने आदेशात म्हटले आहे.