Fri, Nov 16, 2018 02:24होमपेज › Belgaon › कन्नड अभिनेते काशिनाथ यांचे निधन

कन्नड अभिनेते काशिनाथ यांचे निधन

Published On: Jan 19 2018 1:49AM | Last Updated: Jan 19 2018 12:19AMबंगळूर : प्रतिनिधी   
कन्नड चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक काशिनाथ यांचे येथील खासगी इस्पितळात गुरुवारी निधन झाले. 

प्रकृती अस्वास्थामुळे काशिनाथ यांना दोनच दिवसांपूर्वी शंकर कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराला त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाचे वृत्त थडकल्यानंतर चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी काशिनाथ यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. सायंकाळी चामराजपेठ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  काशिनाथ यांनी अभिनयाबरोबरच दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन, चित्रपट निर्मितीमध्येही आपली चुणूक दाखविली होती. त्यांच्या पश्‍चात  मुलगा अलोक, मुलगी अमृतवर्षिणी असा परिवार आहे.