Sat, Sep 22, 2018 01:01होमपेज › Belgaon › विधानसभेत ‘कंबाला’ विधेयक मंजूर

विधानसभेत ‘कंबाला’ विधेयक मंजूर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक सरकारने कंबाला विधेयक विधानसभेत मंजूर केले असून ते विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवून दिली असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे किनारपट्टी जिल्ह्यामध्ये कंबाला शर्यती (रेड्यांच्या शर्यती) आयोजित करण्यासाठी सरकारची मंजुरी मिळाली आहे. 

पेटा इंडिया या संस्थेने कंबाला विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर मुख्य न्यायाधीश दीपक मिश्री, न्या. ए. एम. खानविलकर व डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सुनावणी करून सदर याचिकेवर पुढी महिन्यात  सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथ्रा हे एका स्वयंसेवी संस्थेच्यावतीने सदर खटल्याचे कामकाज पहात आहेत. कर्नाटक सरकारने एक वटहुकूम काढून तो कार्यरत ठेवल आहे. त्याला राष्ट्रपतींची  मंजुरी मिळालेली नाही. कर्नाटकाचे अ‍ॅडव्होकेट जनरल देवदत्त कामत यांनी प्राण्यावरील क्रूरते संबंधीचे नियंत्रण असणार्‍या कर्नाटक दुरुस्ती विधेयक 2017 संबंधीचे विश्‍लेषण न्यायालयाला कथन केले आहे.