Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Belgaon › ‘कालिका’ सोसायटीचे साडेचार किलो सोने जप्‍त

‘कालिका’ सोसायटीचे साडेचार किलो सोने जप्‍त

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 12 2018 10:59PMबेळगाव : प्रतिनिधी

येथील कालिका दैवज्ञ सौहार्द सहकारी  सोसायटीमध्ये झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी खडेबाजार पोलिस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीवरुन तिघांना अटक करण्यात आली आहे.  या गैरव्यवहारातील तारण ठेवण्यात आलेले साडेचार किलो सोने पोलिसांनी विविध फायनान्समधून जप्‍त केले आले आहे.  

कालिका दैवज्ञ सहकारी सोसायटीच्या व्यवस्थापकांसह वसुली कर्मचार्‍यांनी सोसायटीमध्ये   तारण ठेवलेले ग्राहकांचे सोने लांबविल्याप्रकरणी खडेबाजार पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. यावरुन सोसायटीचे व्यवस्थापक मंगेश शशिकांत शिरोडकर (वय 44 रा. शास्त्रीनगर) श्रीशैल यल्‍लाप्पा तारीहाळ (वय 35 रा. मारीहाळ) मारुती महाबळेश्‍वर रायकर (वय 45 रा. नार्वेकर गल्‍ली, शहापूर) यांना अटक करुन चौकशी केल्यानंतर सोसायटीतून गायब सोन्याचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी मुत्तूट फायनान्स, मणिप्पूरम  या फायनान्स संस्थांमध्ये ठेवण्यात आलेले सोने ताब्यात घेतले आहे. तसेच काही सहकारी सोसायटी व काही जणांकडे सोने ठेवून पैसे उचलल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी संबंधितांकडून सोने जप्‍त केले आहे. 

खडेबाजार पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी व त्यांच्या सहकार्‍यांंच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या तपासकार्यातून सदर सोने जप्‍त करण्यात आले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.