Tue, Jul 23, 2019 06:27होमपेज › Belgaon › काकतीतील गटारीची दुरुस्ती

काकतीतील गटारीची दुरुस्ती

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 11:06PMबेळगाव : प्रतिनिधी

काकती येथील सिद्धेश्वर मंदिरासमोरील राष्ट्रीय महामार्गाच्या जवळील गटारीतून ड्रेनेजचे पाणी तुंबून दुर्गंधी पसरली होती. याकडे ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केले होते. याबाबत दै. ‘पुढारी’ने आवाज उठविताच जागे झालेल्या प्रशासनाने गटार दुरुस्त केली आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  गटार नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यावर गटारीचे पाणी येत होते. यामुळे या भागात दुर्गंधी पसरली होती. वारंवार तक्रार करूनदेखील प्रशासनाने  दुर्लक्ष चालविले होते. याबाबत दै. ‘पुढारी’च्या 10 मार्चच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने गटार दुरुस्त केली.

राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या रस्त्यावरील हा प्रकार असल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती. दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत असे. यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.  शनिवारी गटार दुरुस्त करण्यात आली. याठी ग्रा. पं. सदस्य परशराम नार्वेकर, नागेश पाटील, ग्रा. पं. विकास अधिकारी पोळ यांनी विशेष प्रयत्न केले.