Sun, Nov 18, 2018 19:48होमपेज › Belgaon › श्रीमंत पाटील ठरले जायंट किलर

श्रीमंत पाटील ठरले जायंट किलर

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 20 2018 12:01AMचिकोडी : प्रतिनिधी

कागवाड मतदारसंघातून सलग चारवेळा भाजपकडून निवडून आलेले राजू कागे यांचा 33 हजार 500 इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव करत काँग्रेसचे श्रीमंत पाटील जायंट किलर ठरले. कागवाड मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून या मतदारसंघावर चारवेळा भाजपचे राजू कागे निवडून गेले होते.  2013 मध्ये श्रीमंत पाटील निजदकडून निवडणूक लढवत केवळ 1500 मतांनी भाजपच्या राजू कागेंकडून पराभूत झाले होते. यापूर्वी अनेकदा श्रीमंत पाटील यांना अवघ्या काही अंतराने राजू कागेंविरोधात पराभव पत्कारावा लागला होता.

अनेक वर्षांपासून निजद पक्षात असलेले व पक्षाच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य श्रीमंत पाटील यांनी यंदा मुलांच्या व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत श्रीमंत पाटील यांनी 33 हजार 500 मताधिक्याने राजू कागे यांचा पराभव करत विजय संपादन केला.

श्रीमंत पाटील गेल्या अनेक वषार्र्पासून अथणी तालुक्यात  राजकीय, सहकार, समाजसेवेत कार्यरत आहेत. त्यांनी केंंपवाड साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाला चांगला दर देण्यासह स्वखर्चातून नदीतून उपसा जलसिंचन योजना राबविली. यामुळे नेहमी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या हजारो एकर जमिनी ओलिताखाली आल्या. कारखान्याच्या माध्यमातून शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिले. तसेच कार्यकर्ते व जनसामान्यांच्या अडचणी जाणून सदैव जनसंपर्कात राहणारा चेहरा म्हणून छाप उमटविली. तसेच त्यांच्या मुलांनीदेखील कारखान्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी चांगला संपर्क होता. यामुळचे  मतदारांनी त्यांनी कौल देत भाजपाचा बालेकिल्ला घेण्यात श्रीमंत पाटील यांना यश मिळाले.राजू कागेंसारख्या प्रबळ उमेदवारास धूळ चारत विजयी होणारे श्रीमंत पाटील खर्‍या अर्थाने राजू कागेंसाठी जायंट किलर ठरल्याचे स्पष्ट होते.