Thu, May 23, 2019 21:16
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › तानाजी चौगुले ‘कडोली श्री’ किताबाचा मानकरी

तानाजी चौगुले ‘कडोली श्री’ किताबाचा मानकरी

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 8:01PMकडोली : वार्ताहर

येथील स्वामी विवेकानंद युवक संघ व यमकनमर्डी मतदारसंघातील युवा नेते उद्योजक लखन जारकीहोळी पुरस्कृत जिल्हास्तरीय व कडोली गावमर्यादित ‘कडोली श्री 2018’ शरीरसौष्ठव स्पर्धा कडोलीच्या पीकेपीएस सोसायटी मैदानावर रविवारी पार पडल्या. तानाजी चौगुले याने ‘कडोली श्री 2018’ जिल्हास्तरीय किताब पटकाविला. गावमर्यादित पुरस्कार राजेश पाटील याने मिळविला. दुरदुंडेश्‍वर मठाचे स्वामीजी म.नि.प्र. गुरुबसलिंग स्वामी व इतर मान्यवरांनी देवदेवतांचे पूजन केले. त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी रमाकांत कोंडूसकर, शिवाजी कागणीकर, परशराम कडोलकर आदींनी मार्गदर्शन  केले. 

55 किलो गटात बबन पोटे, केदार पाटील, गजानन कांबळे, 60 कि. गटात उमेश गंगणे, निलेश खन्नूकर, ओमकार हळदणकर, 65 किलो गटात राम दोड्डणावर, विकास शहापूरकर, विवेक पोटे, 75 किलो गटात प्रताप कालकुंद्रीकर, राजू हिंग्लजे, राजेश पाटील, 80 किलो गटात सिद्धू देशनूर, गजानन काकतीकर, सुनील भातकांडे, 85 किलो  गटात संदीप पाटील, व्ही. बी. किरण, विशाल चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. गावमर्यादित कडोली ‘श्री 2018’ राजेश पाटील, राहुल राजाई, विनोद फडके, गौतम पाटील, विनायक कुट्रे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय, तृतीय, चौथा, पाचवा क्रमांक पटकाविला. बेस्ट पोझर किताब राजकुमार दोरगुडे व चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब तानाजी चौगुले यांनी पटकाविला. 

यावेळी एम. गंगाधर, राजेश लोहार, अनिल अंब्रुळे, प्रशांत सुगंधी, अनंत लंगरखांडे, सुनील पवार, सुनील राऊत यांनी पंच म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन अनुप पवार यांनी केले.  जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे, ग्रा. पं. अध्यक्ष राजू मायाण्णा, नारायण पाटील, आर. आय. पाटील, मनोज पावशे, अशोक मुद्दण्णवर, उद्योजक अनिल कुट्रे, नारायण पाटील, विनायक होनगेकर उपस्थित होते.